शनिवारी 9 एप्रिल, दुर्गाष्टमीच्या दिवशी, धनप्राप्तीसाठी, घराच्या मुख्य दरवाजावर लटकवा ही चमत्कारिक वस्तू…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी करायचा एक चमत्कारिक व शीघ्र गतीने लाभ देणारा उपाय हिंदु शास्त्रामध्ये सांगितलं आहे. चैत्र नवरात्री 2 एप्रिल 2022 रोजी सुरू झाली असून 11 एप्रिल 2022 रोजी समाप्त होत आहे.

चैत्र नवरात्री मधील अष्टमी 9 एप्रिल 2022 रोजी शनिवार आहे. अष्टमीचा दिवस हा अष्टलक्ष्मी मातांचा दिवस असतो, या दिवशी विशेष असे उपाय केल्याने आपल्याला व आपल्या परिवाराला अष्टलक्ष्मी देवीचा कृपाशिर्वाद प्राप्त होतो.

चैत्र महिन्यातील येथे शनिवार 9 एप्रिल 2022 रोजी असणार आहे, या तिथीला दुर्गअष्टमी असे सुद्धा म्हंटले जाते. ही अष्टमी तिथी 8 एप्रिल 2012 रोजी रात्री 11 वाजून  5  मिनिटांनी सुरू होईल.

9 एप्रिल 2022 रोजी रात्री 9 वाजून 23 मिनिटांनी समाप्त होईल. अष्टमी तिथीही अष्टलक्ष्मी मातांना समर्पित असते, त्या दिवशी आपण काही विशेष उपाय करून अष्टलक्ष्मी देवींना प्रसन्ना करू शकतो, त्याचा कृपाशीर्वाद करून घेऊ शकतो.

आजच्या या उपायाने अत्यंत प्रभावाने अष्टलक्ष्मी मातांचे आपल्या घरामध्ये आगमन होईल.

लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होऊन आपल्याला धनधान्याने संपन्न बनवतील, आपण हा उपाय मनामध्ये कोणतीही शंका न आणता, पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि विश्वासाने करणे जरुरीचे आहे तर आपल्याला याचे परिणाम अनुभवायला मिळते.

जर आपल्या जीवनामध्ये संकटांचा सामना करावा लागत असेल, वारंवार नुकसान सोसावे लागत असतील, खर्च जास्त असेल घरांमध्ये उद्योग व्यवसायामध्ये बरकत होत नसेल, पैसे मिळण्याचे मार्ग मिळत नसतील विनाकारण पैशांचा अपव्यय होत असतील कर्जाच्या ओझ्याखाली असल्यास, तर या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करून पहा. आपल्याला याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतील.

तर शनिवारच्या दिवशी आपण सकाळी नित्यकर्म झाल्यानंतर जेव्हा आपल्या घरामध्ये 9 एप्रिल 2022 शनिवारच्या दिवशी एक लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे.

मग या कपड्यात कोळशाच्या एक तुकडा ठेवायचं आहे. तसेच थोडं उद घालायचे आहे.

तसेच थोडेसे उदबत्तीचा अंगारा घालायचा आहे, मग थोडा कुंकु घालून कापड बांधायचे आहे. मग या कापडाचे तोंड लाल धाग्याने 7 वेळा गुंडाळून घ्यायचे आहे.

मग ही पोटली आपल्या घरातील लक्ष्मी मातेचे फोटो समोर किंवा दुर्गा मातेचे फोटो समोर ठेवायची आहे. मग त्यावर  हळद-कुंकू पुष्प वाहायचा आहे, एवढे करून झाल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे,, तो मंत्र म्हणजे,

|| ॐ ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा ||

|| ॐ ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा ||

|| ॐ ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा ||

याचा आपण कमीतकमी पाच मिनिटे जप करायचा आहे, जप करून झाल्यानंतर लक्ष्मी मातेच्या समोर ठेवलेली ही पोटली घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बांधायची आहे.

अष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातांचे आगमन होऊन त्या घरामध्ये विराजमान होतील व जीवन आनंदाने भरून जाईल.

आपल्या जीवनातील सर्व प्रकारची आर्थिक संकटे संपून जावे, तर अष्टमीच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करा…..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!