सीताफळाची पाने खाल्याने जे होते ते ऐकून पायाखालची जमीन सरकून जाईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे. काळे, घनदाट केस कोणाला आवडत नाहीत.

मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा या समस्या वाढतात. हल्ली जगातील अनेक जण केसांशी संबंधित समस्याने त्रस्त आहेत.

यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे सीताफळ. या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात.

केस गळण्याचे प्रमाण अधिक असेल तर सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधात उगाळून लावा. नवीन केस उगवतील. सीताफळाच्या पानांचा लेप फोडांवर लावल्यास ते ठीक होतात.

न उच्च रक्तदाब तसेच हृदयरोगाच्या पेशंटनी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते. सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व असते.

तसेच त्यात आद्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नसíगक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे.

तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे. सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते.

स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे.

याचा वापर वर्षभर करता येतो.आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.

कृश व्यक्तीने वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते.

ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.

सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात व उवा व लिखाही होत नाहीत.

सीताफळमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी असते ते जे आपल्या शरीरात पेशी समूह क्लियर ठेवण्यासाती काम करते. सीताफळमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्तं प्रमाणात आसते जे आपल्याल रुदय विकारापासून बचाव करण्यास मदत करते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!