धनत्रयोदशी नक्की खरेदी करा या 13 वस्तू माता लक्ष्मी धावत येईल, पैशांचा ढीग लागेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम नमः शिवाय, दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. या दिवाळीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात आणि हे उपाय अत्यंत प्रभावशाली देखील असतात.

आज आपण पाहणार आहोत धनत्रयोदशीला आपल्याला कुठल्या वस्तू घरामध्ये आणायचे आहेत, जेणेकरून माता लक्ष्मीचा स्थायी निवास आपल्या घरामध्ये राहील.

सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला धनत्रयोदशीला घरी आणायचे आहे म्हणजे लक्ष्मी गणेश मुर्ती म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश यांचे एकत्र फोटो किंवा मूर्ती आपल्या घरी आणायचे आहे.

यामुळे आपल्या घरामध्ये धन वैभवासाठी माता लक्ष्मी व भगवान गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहते. तसेच दुसरी वस्तू म्हणजे धातूची वस्तू होय. आपल्याला कुठल्याही धातूची वस्तू या दिवशी घरात आणायचे आहे.

सोने-चांदी किंवा पितळ, तांबे यापैकी कुठल्याही धातूची वस्तू आपण घरात आणायचे आहे. यामुळे आपला भाग्योदय होतो.

जर तुम्ही सोन्याचे अलंकार जरी आले तरी ते सर्वश्रेष्ठ आहेत. आपल्या कुवतीनुसार आपल्याला जसं परवडेल, त्यानुसार आपण एखादी धातूची वस्तू घरामध्ये आणायचे आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे श्रीयंत्र होय.

माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या श्रीयंत्र आपल्याला धनत्रयोदशीला घरांमध्ये आणायचं आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते तिथे मात्र लक्ष्मी आकर्षित होते. माता लक्ष्मीचे आगमन या घरांमध्ये होतं.

चौथी वस्तू म्हणजे शंख होय. शंख हे सुख-समृद्धीचे प्रतीक आहे, ज्या घरामध्ये शंख असतो शंखनाद केला जातो तिथे सुख आणि-समृद्धी सदैव राहते. पुढील वस्तू म्हणजे कुबेर देवताची मुर्ती किंवा प्रतिमा होय.

ज्या घरामध्ये कुबेर देवताची मूर्ती किंवा प्रतिमा असते, तिथे “दिन दुगणी, रात चौगुणी” असे म्हणतात त्याप्रमाणे प्रगती होत जाते.

सहावी वस्तू म्हणजे झाडु. झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानला गेला आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये साफसफाईला खूपच महत्त्व आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करते,

त्यामुळे असलेल्या दिवसांमध्ये साफसफाई तर करायचे आहेत पण त्यासोबतच धनत्रयोदशीला एक झाडू आपण घेऊन यायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. सातवी वस्तू आहे ती म्हणजे मीठ धनत्रयोदशीला घेवून यायचं आहे.

जर तुमच्या घरामध्ये आधीपासून वेळ असेल तरीदेखील या दिवशी आपण पुन्हा मिठ घेऊन यायचा आहे आणि दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये तुम्ही जे काही खाद्यपदार्थ बनवून मिठाचा वापर आपल्याला करायचा आहे.

तसेच या दिवसांमध्ये जेव्हा आपण फरशी पुसून तेव्हा त्या पाण्यात देखील आपल्याला हे मीठ टाकायचे आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाईल.

आपल्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही. तसेच सुख-शांती आपल्या घरामध्ये नांदेल. तसेच घरातील दरिद्रता कायमची निघून जाईल. आठवी वस्तू ती म्हणजे धने होय.

धने हे धनाचे प्रतिक मानलं जातं, त्यामुळे धनत्रयोदशीला पण पूजेमध्ये घेणे आवश्यक आहे व त्याची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धने आपण आपल्या घरातील कुंडीमध्ये टाकायचे आहेत आणि त्याला दररोज पाणी घालायचा आहे.

यामुळे आपल्या घरामध्ये पैसा देखील वाढत जातो. नववी वस्तू म्हणजे गोमती चक्र होय. ज्यांला भगवान विष्णूचं प्रतिक मानलं जातं. 5, 7,11 किंवा 21 अशाप्रकारे तुमच्या इच्छेप्रमाणे गोमती चक्र आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत.

आणि त्यांची पुजा करायचे आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये हे गोमती चक्र ठेवायचे आहेत. असे केल्याने आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. तसेच दहावी वस्तू म्हणजे, कवडी होय.

माता लक्ष्मी कवडी अत्यंत प्रिय आहे, समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरीने अमृत प्राशन केलं, तेव्हा अमृताचा एक थेंब खाली पडला त्यामधून कवडीची निर्मिती झाली. तर अशी ही अत्यंत पवित्र कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे,

तर अशा 5,7 किंवा 11 कवद्या आपल्याला धनत्रयोदशीला घरी घेऊन यायचे आहेत.

तसेच अकरावी वस्तू म्हणजे, सात मुखी रुद्राक्ष होत. घरामध्ये रुद्राक्ष असणे अत्यंत शुभ मानले गेले आहेत, त्यामुळे आपल्याला धनत्रयोदशीला 7 मुखी रुद्राक्ष देखील घरात आणायचा आहे.

बारावी वस्तू आहे ती म्हणजे दिवा किंवा पणत्या होय. त्यात तर दरवर्षी आपल्याला दिवाळीला नवीन दिवे खरेदी करायचे आहेत, मागील वर्षीचे जुने दिवे आपण कधीही वापरू नका.

पण प्रत्येक वर्षी दिवाळीला आपण नवीन दिवे आहेत. जुने दिवे दिवाळीला चुकूनही वापरू नका.

तेरावी वस्तू आहे ती म्हणजे कमल गट्टा होय. कारण माता लक्ष्मीला कमल गट्टेची माळ अत्यंत प्रिय आहे तुम्ही या दिवशी कमल गट्टेची महादेव मनी सुद्धा आणू शकता.

तुम्हाला जितक्या जास्तीत जास्त यापैकी वस्तू आणता येतील त्या पण घरी घेऊन यायचे आहेत. कारण तर धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूंची खरेदी केल्याने त्यामध्ये तेरा पटीने वृद्धी होते.

असं म्हटलं जातं की, कुठली वस्तू आपण धनत्रयोदशीला आणतो तेव्हा त्याच्यात तेरा पटीने वृद्धी होते. त्यामुळे शक्यतो जास्त वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा निवास आपल्या घरामध्ये राहील.

आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य कायमचे निघून जाईल, तर तुम्ही देखील धनत्रयोदशीला यापैकी जितके शक्य असेल तितक्या वस्तू नक्की आणा. माहिती आवडली असेल तर लाईक करा..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!