नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. घराचे बांधकाम करतांना वास्तुशास्त्राचा विचार केला जातो, कारण घरातील प्रत्येक वस्तू जर योग्य दिशेला असेल तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात.
परंतु काही वस्तू या चुकीच्या दिशेला असते, तर त्याचे वाईट परिणाम आपल्या जीवनावर पडतात. वास्तुशास्त्रात पाण्याची, अग्नीशी आणि देवी-देवतांचे अशी प्रत्येक बाब जागा निश्चित केलेली आहे आणि आपण जर पाण्याच्या ठिकाणी अग्नी आणि आगीच्या ठिकाणी पाणी असे चुकीचे रचना जर आपल्या घराची केले तर आपल्याला त्याचे अशुभ फळे देतात.
वास्तूमध्ये वास्तुपुरुष असतो आणि वास्तुपुरुषाची डोके हे ईशान्य दिशेला तर पाय हे नैऋत्य दिशेला असतात. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराची रचना करावी लागते. आपण घराचे बांधकाम करताना इतर सर्व वस्तू कपडे नीट लक्ष देतो.
परंतु घरात पाण्याचे योग्य दिशा कोणती, पिण्याचे पाणी कोणत्या दिशेला असावे, सांडपाणी कोणत्या दिशेला सोडावे, पाण्याची साठवणुकीची जानकी कोणत्या दिशेला असावी या गोष्टीकडे नीट लक्ष देत नाहीये. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
बहुतेक वेळा पाण्याशी संबंधित वास्तुदोष यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येते, तसेच घरातील गृहिणी ही सतत कोणत्या ना कोणत्या नेहमी आजारी पडते, म्हणून घरातील वापराचे पाणी पिण्याचे पाणी योग्य ठिकाणी असणे फार आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार विहीर, कूपनलिका किंवा जलतरण तलाव हे जर असेल,तर ते नेहमी घराच्या ईशान्य दिशेला असावेत.कारण ईशान्य दिशा ही पाण्याची दिशा आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य भागात विहीर बनवणे, अत्यंत शुभ मानले जाते.
ईशान्य दिशेला विहीर असल्यास, आपल्याला सर्व प्रकार वैभव व ऐश्वर्याचे प्राप्ती होते. वास्तुशास्त्रानुसार तर पूर्व दिशेला विहीर करायचे असेल, तर उत्तर दिशेला थोडीशी जमीन खणावी, त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते.
वास्तुशास्त्रानुसार जर आपल्याला भूमिगत म्हणजे जमिनीच्या खाली अशी पाण्याची टाकी बनवायचे असेल तर, ती वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय, दक्षिण दिशांना अजिबात बनवू नये.
कारण वास्तुशास्त्रानुसार भूमिगत पाण्याच्या टाकीसाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय. त्याशिवाय उत्तर पश्चिम तसेच पूर्व दिशेला की आपण भूमिगत बनवू शकतो. जर आपल्याला छतावर पाण्याची टाकी ठेवायचे असेल,
तर ती पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मधोमध किंवा वायव्य आणि पश्चिम दिशेच्या मधोमत ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार छतावरील पाण्याची टाकी ईशान्य अजिबात घेऊ नये. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील सर्व सांडपाणी शक्यतो ईशान्य दिशेने बाहेर पडेल, अशी वास्तूची रचना असावी.
घरातील पिण्याचे पाणी हे पूर्व दिशेला असावे. पिण्याच्या पाण्याचे भांडे हे स्वयंपाक घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला भरून ठेवावे. घरातील पिण्याचे पाणी देणे योग्य दिशेला ठेवलेले असेल,
तर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. घरातील कोणत्याही नळातून पाणी टपकत असेल, तर ते लगेच दुरुस्त करावे. कारण पाणी ही संपत्ती आहे आणि जर अशाप्रकारे आपल्या घरात पाणी वाया जात असेल,
तर आपली धनसंपत्ती अशाप्रकारे थोडी थोडी वाया जात राहते व हळूहळू आपल्याला दारिद्र्य येत असते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments