तूळ राशीच्या लोकांच्या 14 खास गोष्टी, कसा राहतो यांचा स्वभाव….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार, तूळ हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. यावर शुक्र ग्रहांचा अंमल आहे. तूळ रास कुंडली मध्ये 7 आकड्याने दर्शवतात.

ही वायू तत्त्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते.
तसेच ज्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू किंवा ते पासून सुरु होत असेल त्यांची राशी तूळ असते.

ही राशीचक्रातील सातवी राशी असून चिन्ह तराजू आहे. शुक्र ग्रह या राशीचा स्वामी आहे. तूळ राशीच्या लोकांच्या 14 खास गोष्टी…

1. या राशीचा स्वामी शुक्र आहे. ही रास असलेल्यांची कफ प्रवृत्ती असते.

2. या राशीचे पुरुष सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर प्रसन्नता विलसत असते. यांचा स्वभाव सम असतो.

3. कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत. इतरांना प्रोत्साहित करणे, आधार देण्याचा त्यांचा स्वभाव असतो. या राशीच्या व्यक्ती कलावंत, सौंदर्योपासक व प्रेमळ असतात.

4. या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात तसेच मित्रांमध्येही लाडक्या असतात.

5. तूळ राशीच्या महिला मोहक व आकर्षक असतात. आनंदी आणि खळखळून हसणाऱ्या असतात.

6. स्वत:चे सौंदर्य दाखवण्याचा त्यांचा स्वभाव असतो.

7. बौद्धिक काम करण्याची त्यांना जास्त आवड असते.

8. यांचा आवाज सर्वांना आवडतो. चेहऱ्यावर नेहमी हास्य राहते.

9. यांना ऐतिहासिक स्थळांचा प्रवास करणे आवडते. हे एक उत्तम पार्टनर आहेत, मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक.

10. मानाने उदार आणि न्यायप्रिय असतात. कला आणि साहित्याशी संबंधित असतात. यांना गीत,संगीत, प्रवास इ. गोष्टींचे आवड असणारे लोक जास्त आवडतात.

11. आवडता रंग निळा आणि पांढरा असतो. वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते.

12. वादामध्ये व्यर्थ वेळ वय घालवत नाहीत. सामाजिक कार्य, उत्सवामध्ये आवडीने समाविष्ट होतात.

13. यांची मुले शिक्षण किंवा नोकरीसाठी यांच्यापासून दूर जाऊ शकतात.

14. मुलांना योग्य शिक्षण आणि आत्मविश्वास देणारे हे पालक असतात. याशिवाय, तुम्ही वेगवेगळे छंद कलांची जोपासना करणारे आहात. देव भोळे भावनाप्रधान मायाळु जीवनावर श्रध्दा असणारे कर्तव्य आणि प्रेम दोन्हींचा समतोल संभाळणारे असे आहात.

तुमच्याकडे न्याय निष्ठुरता, निश्चय, आग्रह नाही. उत्कृष्ट बुध्दीचा विकास प्रत्येक गोष्टीमध्ये स्थिर तत्व शोधून काढण्याची ताकत तुमच्याकडे आहे. तुम्हाला जन्मताच सौंदर्याची आवड असते. तुम्ही खूपच कनवाळू इतरांवरती माया असलेले दयाळू दुसऱ्यांचे अश्रू पुसणारे आहात.

जीवनामध्ये कितीही चढ-उतार आले, कितीही विचित्र घटना घडल्या तरीही खचून न जाता तुम्ही वैभव आणि प्रतिष्ठा मिळवताच. बरेचसे लोक संकटातून धाडसाने मार्ग काढतात, पण तुम्ही संकटालाच संधी समजता आणि निर्भयपणे त्यातून मार्ग काढतात.

तसेच आपल्याला पाहीजे ते मिळवण्यासाठी हवे तेवढे कष्ट प्रयत्न करण्याची तुमची तयारी असते आणि या ना त्या मार्गाने यश निश्चयाने तुम्ही मिळवून दाखवता. पण तुम्ही खुपच संयमी असल्यामुळे यशाने हुरळूनही जात नाही.

तुम्ही अभिमानी गोडबोल्या स्वभावाचे असून तुम्हाला नवनवीन ओळखी करून गप्पा मारायला खूप आवडत. प्रेम, मैत्री, सहानुभुती, योग्य समज, सहकार्य, संयमी, भरपूर कष्टाची तयारी, हेच राशी स्वभावातील गुण तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

One thought on “तूळ राशीच्या लोकांच्या 14 खास गोष्टी, कसा राहतो यांचा स्वभाव….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!