रामनवमीच्या दिवशी हि एक गोष्ट आवर्जून खा..वर्षभर पैसाच पैसा येईल

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, रामनवमीच्या दिवशी हि एक गोष्ट आवर्जून खा..वर्षभर पैसाच पैसा येईल

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.

हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा होतो. श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात.

श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.

श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

तुम्हालाही यंदा रामनवमी तुमच्या परिवारासाठी अतिशय संस्मरणीय बनवायची असेल तर रामनवमीला काही गोष्टी घरात आणाव्यात. रामनवमी आता काही दिवसांवर आली आहे.

चैत्र नवरात्रीची सांगता नवमीने होणार आहे आणि त्याच दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म असणार आहे. भारताच्या उत्तरेकडील राज्यात मुख्यत्वे चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

याचं कारणच मुळात त्यापाठोपाठ येणाऱ्या श्रीराम नवमीचं असतं. रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जाईल.

मात्र तुम्हालाही यंदा रामनवमी तुमच्या परिवारासाठी अतिशय संस्मरणीय बनवायची असेल तर रामनवमीला काही गोष्टी घरात आणाव्यात. या गोष्टी घरात आणल्याने घरात भक्तीचं आणि प्रसनेनतेचं वातावरण राहातं असं सांगितलं जातं.

पाहूयात रामनवमीला घरात कोणत्या वस्तू आणाव्यात. या दिवशी पूजेच्या वस्तू, शुभ वस्तू, पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करा. राम नवमीच्या दिवशी चांदीचा हत्ती खरेदी करून घरात स्थापित करावा.

राम नवमीला तुम्ही हनुमान किंवा श्रीराम सीतेची मूर्ती देखील खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही घरासाठी सजावटीच्या वस्तूही खरेदी करू शकता. राम नवमीच्या दिवशी वाहन, जमीन किंवा इमारत खरेदी करणे देखील शुभ असते.

कसा साजरा करतात रामनवमीचा दिवस या दिवशी घरोघरी धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं. संध्याकाळी घरात रामरक्षा स्त्रोत्र म्हटलं जातं. अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाचे आयोजनही केले जाते.

रामाची मूर्ती फुलांनी आणि हारांनी सजविली जाते आणि पाळणामध्ये स्थापित केली जाते. अनेक ठिकाणी पालख्या किंवा मिरवणुका काढल्या जातात. अयोध्येत राजजन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!