शिवलिंगावर श्रावण महिन्यात जल अर्पण का केले जाते???….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि दिनदर्शिकेनुसार,वर्षातला पाचवा महिना असतो.याशिवाय या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यामुळे या महिन्याला श्रावण मिळाले.

या महिन्यात भगवान शंकराला पाणी आणि दुधा यासह आणखी काही पदार्थ अर्पण केल्यास, भगवान शंकर यांची कृपादृष्टी आपल्यावर पडते.

आपल्या इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण भगवंतांचे पूजन करत असतो,पण जर श्रावण महिन्यात आपण देवाधिदेव महादेवांचे पूजन केल्यास, तर त्याचे फळ आपल्याला अधिक व जलद गतीने मिळत असते.

त्यामध्ये आपण भगवान शंकराची पुजा करतांना, वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत असतो. त्याचे फळही वेगवेगळे मिळत असते.

यातील पहिली वस्तु म्हणजे. कारण महादेवांना अखंड तांदूळ अर्पण केल्यास, आपल्यावरील सर्व कर्ज लवकरात लवकर कमी होण्यास सुरुवात होते.परंतु महादेवांना किंवा इतर कोणत्याही पूजनात अखंड तांदूळ अर्पण करावे,

चुकनही तुटलेले किंवा तुकडा पडलेले तांदूळ कधीही पूजनात वापरू नयेत,कारण यामुळे आपले पूजन अपूर्ण मानले जाते तसेच आपण महादेवांना भात अर्पण केल्यास, विवाहेच्छुक किंवा तरुणी यांचे लग्न जमत नसेल, त्यांचे लग्न खूप लवकर जमते.

भगवान शंकराना साजूक तूप अर्पण केल्याने,आपल्याला संतानप्राप्ती होते.ज्या लोकांना संतान प्राप्तीची इच्छा असेल, अशा जोडप्याने महादेवांना या श्रावण अखंड महिनाभर साजूक तूप व पाणी अर्पण करावे.

तसेच हे कार्य पती-पत्नी दोघांनी मिळून केले पाहिजे. यामुळे खूपच लवकर त्यांची संतानप्राप्ती पूर्ण होते. तसेच महादेवांना गहू किंवा जव अर्पण केल्यास, पती-पत्नीमध्ये वाद-विवाद नष्ट होऊन,त्याच्यामध्ये एकमेकांनाबद्दल प्रेमाची भावना निर्माण होते.

याशिवाय आपल्या घरात अन्नधान्याची भरभराट होते. अशा प्रकारे महादेवांना गहू किंवा जव अर्पण केल्यास,सर्व प्रकारची कौटुंबिक सुखे व्यक्तीला प्राप्त होत असतात.

तसेच आपण दुधाचे आणि पाण्याचे दूध मिश्रण महादेवांना अर्पण केले तर, आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते.आपले स्वास्थ्य निरोगी राहण्यास मदत होते. तसेच ज्या व्यक्ती खुप काळापासून आजारी आहेत,

त्या व्यक्तीने दुधात पाणी टाकून ते मिश्रण महादेवांना “ओम नमः शिवाय”या मंत्राचा जप करीत अर्पण केल्यास, आजारपण दुर होण्यास सुरुवात होईल.

भगवान शंकराची पूजा करतेवेळी, केशर अर्पण केल्यास आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तसेच आपल्याला मानसन्मान प्रसिद्धी मिळते.याशिवाय आर्थिक प्रगती होते, कोणत्याही प्रकारच्या अडचणी राहात नाहीत.

याचबरोबर आपण जर महादेवांना उसाचा रस, गूळ किंवा साखर अर्पण ककेल्यास, जीवनात आपण नेहमी सौभाग्यशाली राहतो,तसेच आपले दारिद्रय नाहीसे होते. आपले जीवन बदलून आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होईल आणि आपण नेहमी आनंदी तसेच प्रसन्न राहो.

याशिवाय असे म्हणतात की, आपण महादेवांना दही अर्पण केल्यास,आपण धैर्यवाण बनतो. त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत, शांततेत निर्णय घेऊन,प्रत्येक संकटाचा सामना करु शकतो.

तसेच आपले व्यक्तीमत्व आकर्षित करण्यासाठी,भगवान शंकराना चंदन अर्पण करावे.त्यामुळे आपला मान सन्मान वाटतो.

तसेच महादेवांना मध अर्पण केल्यास, आपल्या बोलण्यात गोडवा येण्यास सुरुवात होते.जर आपले बोलणे इतरांना नेहमी वाईट वाटत असेल ,तरीही जर आपण महादेवांना मध अर्पण केल्यास, आपल्या बोलण्यात माधुर्य निर्माण होईल.

याशिवाय भगवान शंकराची पूजा करतांना, त्यांना भांग किंवा बेलाची पाने अर्पण करावीत,कारण महादेवांना भांग आणि बेलाचे पाने अतिप्रिय असतात.यामुळे आपल्या जीवनात सर्व वाईट गोष्टी नष्ट होण्यास मदत होईल.

महादेवांना पांढरा रंग अतिप्रिय असल्याने,त्याना पांढरे वस्त्र किंवा पांढरे फूल अशी पांढऱ्या रंगाचे कोणतीही वस्तू महादेवांना अर्पण केली, तर महादेव आपल्याला स्वास्थ्य प्रदान करतात.

आपले आरोग्य चांगले राहते, याशिवाय आपल्याला एखादी आपली इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करायचे असेल, तर एक विड्याचे पान घेऊन त्यावर दोन लवंगा आणि एक वेलची, थोडासा लाल पिवळा नाडा व एक सुपारी ठेवून, ते पान महादेवाला अर्पण करावे.

यामुळे आपली जी काही इच्छा मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल. यासह, बेलची पाने देखील अर्पण केली पाहिजे.श्रावण महिन्यात बेलपात्राला खूप महत्त्व आहे.तसेच कोणतेही पूजन करताना त्यात श्रद्धा व विश्वास ठेऊन केल्यास,त्याचे फळ नक्कीच मिळत असते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!