26 मे, मोठा गुरुवार, एकादशीला चिमूटभर हळद आणि तुळशीची मातीचा हा उपाय, तुमचे नशीब उजळेल, सर्व संकटांचा अंत होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो वा धार्मिक किंवा मांगलिक कार्य, हळद वापरली जाते. मसाल्यात हळदी वापरल्याने खाण्याची रंगत वाढते तसेच हळद औषधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे.

ज्योतिष शास्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत. हळदी वापरून अनेक ग्रहीय समस्या सोडवता येऊ शकतात. हळदीच्या पिवळ्या रंगाला बृहस्पती ग्रहाशी जोडून बघितलं जातं.

म्हणून जातकाच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबुती प्रदान करण्यासाठी हळद वापरली जाते. तसेच जीवनात धनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी हळद वापरावी. गाठ असलेली हळद पिवळ्या दोर्‍यात बांधून आपल्या बाजूला किंवा गळ्यात घालावी.

कोणत्याही गुरुवारी या प्रकारे हळद धारण केल्याने शुभ फल प्राप्ती होते. धन संबंधी समस्या सुटते. तसेच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या आणि नारंगी रंगाची देखील असते.

पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पती, काळ्या हळदीचा संबंध शनी देव तर नारंगी रंगाच्या हळदीचा वापर मंगळ ग्रहासाठी करतात.याचबरोबर, कर्करोग किंवा पोटासंबंधी आजारी लोकांनी हळदीचे दान करावे.

दररोज हळदीचा टिका लावून घरातून बाहेर पडावे. याने वाणीला देखील शक्ती मिळते. तसेच विवाहात अडचण येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी.

या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळलेल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देत असलेल्या लोट्यावर हळद लावावी आणि अर्घ्य देण्यानंतर तिच हळद आपल्या कपाळावर आणि गळ्यावर लावावी याने सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग बनतात.

तसेच इतर लोकं देखील अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळू शकतात. याने तेज वाढतं आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. याने कोणाची वाईट दृष्टीचा आपल्यावर प्रभाव पडत नसतो.

तसेच घरात वाद होत असतील, अनावश्यक कटकट होत असल्यास घरात मांगलिक कार्य आणि हवनात हळद वापरणे योग्य ठरेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीचे तिलक केल्याने कामात यश मिळतं.

आता काळी हळदीचा उपाय जाणून घ्या ज्याने दुर्भाग्य दूर होतं. धन संचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद, नागकेशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायांच्या स्पर्श करवावा.

नंतर धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावं. आपण चांदीच्या डबीऐवजी इतर चांगल्या धातूची डबी देखील वापरू शकता किंवा एखाद्या शुभ मुर्हतावर एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, चांदी का शिक्का ठेवून त्याला पिवळ्या दोर्‍याने बांधावे. तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवावे.

एक उपाय असा देखील आहे की एखाद्या शुभ मुहूर्तात काळी हळद कुंकू एका जागी ठेवून त्याची पूजा करावी नंतर ही सामुग्री एक-दोन शिक्क्यांसह लाल रंगाच्या कपड्यात बांधून लॉकर मध्ये ठेवावी.

याने धन संबंधी समस्या दूर होतात. व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवार पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, 11 वेळा अभिमंत्रित गोमती चक्र, 11 वेळा अभिमंत्रित धनदायक कोड्या बांधून 108 वेळा विष्णू मंत्र जपत धन ठेवत असलेल्या उपयोग होतो.

तसेच घराच्या प्रवेशद्वारावर तुम्ही दररोज हळदीने ओम आणि स्वस्तिकचे चिन्ह बनवा. त्यावर गंगाजल शिंपडावे. असे केल्याने तुम्ही तुमच्या घराला वाईट शक्तींना दूर ठेवता आणि सकारात्मक उर्जा सर्वत्र वास करते.

तुमची इच्छा असल्यास,तुम्ही घराच्या चारही भिंतींवर हळदीने चिन्हांकित करू शकता. असे केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. याशिवाय, सध्याच्या वातावरणात दुर्बल प्रतिकारशक्तीमुळे लोकं करोनाला बळी पडत आहेत,

अशा परिस्थितीत हळद रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हळद पाणी प्यायल्याने तुमची आजारांपासून मुक्तता होऊ शकते आणि त्याचबरोबर दुधात उकडलेली कच्ची हळद प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

तसेच जर तुमच्याकडे शिक्षण घेणारी मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या अभ्यासासाठी हळदीचा उपयोग करू शकता. कच्ची हळद पेस्ट बनवून मुलांच्या कपाळावर लावा. असे केल्याने त्यांची एकाग्रता वाढते.

दररोज आंघोळ झाल्यावर विद्यार्थी त्यांच्या कपाळावर हळदीचा टिळा देखील लावू शकतात. असे केल्याने मन शांत राहते आणि चांगले शिक्षण मिळविण्यात मदत होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!