19 सप्टेंबर श्री गणेश चतुर्थीला बाप्पाला घरी आणतांना ही 1 चूक अजिबात करू नका..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  19 सप्टेंबर श्री गणेश चतुर्थीला बाप्पाला घरी आणतांना ही 1 चूक अजिबात करू नका..

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… आपल्या कितीही मोठे संकट आले तरी, विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर आपल्या वरील सर्वच संकटे दुर होण्यास मदत होते.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस आपण श्री गणेशाचा उत्सव साजरा करतो.या निमित्ताने गणपती बाप्पा आपल्या घरी येतात, मग ते दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस राहतात आणि त्यानंतर त्यांना निरोप देतो.

गणेशोत्सवाच्या प्रारंभी अनेक लोक बाजारातून श्री गणेशमूर्ती खरेदी करतात आणि या गणेशमूर्ती खरेदी करून त्याची पूजा प्रारंभ करताना हिंदू धर्म शास्त्रात काही नियम सांगितले आहेत.

हिंदू धर्म शास्त्रानुसार,अशा 5 प्रकारच्या गणेशमूर्ती खरेदी करण्यास मनाई केली आहे. त्यांची आपल्या घरातच स्थापना करून त्यांची पूजा करण्यास मज्जाव केलेला आहे. कारण त्या गणेशमूर्ती आपल्या घरात दुःख तसेच दारिद्र्य,

संकटे या गोष्टी उत्पन्न करू शकतात आणि गणपती बाप्पाचा कृपाशीर्वाद तर मिळणार नाहीच, याउलट त्याचा काही सुद्धा लाभ होणार नाही, सर्वकाही निष्फळ होईल.

त्यातील पहिली मूर्ती म्हणजे, अशी गणपती बाप्पांच्या डोक्यावर मुकुट नाहीये, अशी मूर्ती आपण चुकूनही खरेदी करू नका. कारण मुकुट हे गणपती बाप्पांच्या आगमनाचं प्रतीक मानण्यात आलेल आहे आणि जर मुकुट नसलेली मूर्ती आपण आपल्या घरात आणत असाल तर ,

त्यामुळे निश्चितच गणपती बाप्पा त्यांचा आशीर्वाद होणार नाही. याउलट ते क्रोधीत होतील. त्यामुळे जर आपण ऑलरेडी अशा प्रकारची मुकुट नसणारी गणेशमूर्ती खरेदी केली असेल ,तर आपण बाजारातून छोटा मुकुट खरेदी करून तो गणपतीबाप्पांना नक्की परिधान करा मगच पूजा करा.

दुसरी मूर्ती म्हणजे, जी गणेश मूर्ती उभी राहिलेली असेल, उभ्या अवस्थेत आहे,आपण आपल्या घरात माता लक्ष्मीची उभी असणारी मूर्ती स्थापित करू नये ,कारण माता लक्ष्मी चंचल असल्यामुळे, त्यांची उभी असणारी मूर्ती आपल्या घरात असल्यास,

तर लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही, पैसा घरात टिकून राहत नाही, आहे तो पैसा वाईट गोष्टी खर्च होऊ लागतो आणि त्याचप्रमाणे गणपतीबाप्पांना जर आपण उभ्या अवस्थेमध्ये आपल्या घरात आणत असू तर तेव्हाही असेच घडेल.

तिसरी गणेश मूर्ती म्हणजे,शिवपार्वती सहीत असणारी किंवा शिव परिवारासह स्थापित गणेशमूर्ती कधीच खरेदी करू नये. अनेक लोक गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करताना गणपती बाप्पा सोबत भगवान शिवशंकर माता पार्वती बरोबरची मूर्ती एकत्ररित्या घरी आणतात.

परंतु गणेश चतुर्थी निमित्ताने गणपती बाप्पाची पूजा आपण करतो, तेव्हा या देवतांकडे आपल्याकडून नकळतपणे अनावधानाने दुर्लक्ष केलं जातं.

कारण शिवपार्वतीची म्हणावी तितकी पूजा आपल्या हातून होत नाही आणि म्हणून अशा प्रकारे एखाद्या देवतेची आपल्या हातून कळत-नकळत पणे दुर्लक्ष होत असेल, तर त्याचे वाईट परिणाम नक्कीच भोगावे लागू शकता.

याचबरोबर, चौथी मूर्ती म्हणजे, गरुडावरती विराजमान असलेली गणेशमूर्ती घरात आपल्यास,गरुडा सोबत आपल्या घरात दारिद्र्य , दुःख, भय या गोष्टी येण्याची शक्यता असते. घरातील पैसा विनाकारण नको

त्या बाबींमध्ये खर्च होऊन हळूहळू हे विनाशाच्या दिशेने चालू लागतो आणि म्हणून अशी मूर्ती आणू नये. तुम्ही अनेक मंदिरांमध्ये पाहिले असेल, देवळामध्ये , मंदिरामध्ये स्थापित करण्यासाठी अशी मूर्ती योग्य आहे ,

मात्र अशी मूर्ती आपल्या घरात आणू नये. तसेच शेवटची आणि पाचवी मूर्ती म्हणजे, मूषक विना असणारी श्रीगणेशमुर्ती कधीच चुकनही आणू नये.

हिंदू धर्मशास्त्रातील ,गणेश पुराणानुसार मूषक हे गणपती बाप्पांच वाहन आहे, मूषक वर बसूनच बाप्पा सर्वत्र विहार करत असतात,त्यामुळे आपण या मूषकविना श्री गणेशांची मूर्ती आपल्या घरात चुकूनही स्थापन करू नये.

कारण गणपती बाप्पा आपल्या वाहनाशिवाय राहतच नाहीत. सहावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट , म्हणजे गणपती बाप्पांच्या सोंडेची दिशा ! साधारपणे गणपती बाप्पांची सोंड डावीकडे किंवा उजवीकडे असते,

मात्र हिंदू धर्मशास्त्रनुसार, गणपती बाप्पांची सोंड उजवीकडे असेल तर, अशा मूर्तीला दक्षिणाभिमुखी मूर्ती असं म्हणतात आणि उजवीकडे सोंड असणाऱ्या गणेशमूर्तीची पूजा करताना शास्त्रांमध्ये उल्लेखित अनेक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

आपल्या हातून काही कळत-नकळत चुका घडल्या तर,त्या चुकांच मोठी शिक्षा ही आपल्याला नक्की भोगावी लागते,त्यातून सुटका होत नाही , अनेक प्रकारच्या गोष्टी कटाक्षाने पाळावे लागतात,पण अनेकांना पाळता येत नाहीत

आणि म्हणून ज्या गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे आहे ,अशी गणेशमूर्ती आपण चुकूनही खरेदी करू नका.

गणेश मुर्तीची सोंड जी डावीकडे असते, अशी गणेश मूर्ती घरी आणावी.अगदी साध्या पद्धतीने, मनोभावे श्रीगणेशाची पूजा करू शकता, त्यामुळे काही चुका झाल्या तरी सुद्धा श्री गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच क्षमा करतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!