नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते.
पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा.
श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते.
आपल्यातील अनेक लोक गरिबी दुर करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी म्हणून तसेच घरामध्ये पैसा यावा म्हणून आणि घरामध्ये वादविवाद होऊ नये म्हणून श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा अर्चना आणि त्याचे नाव जप करत असतात.
अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. परंतु काही लोकांच्या समस्या कधी संपतच नाही, कारण या लोकांना त्यांचे नशिबाची साथ कधी मिळतच नसते.
परंतु आपण स्वामी समर्थांची अशी एक विशेष सेवा पाहणार आहोत ज्यामुळे आपले नशीब देखील आपल्याला साथ द्यायला सुरुवात करेल आणि आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील.
तर ही स्वामी समर्थांची अनेक सेवेकरी श्री स्वामी समर्थ यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून मी रोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जाऊन देवाची पूजा करून झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात.
यामध्ये हे फक्त स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेला अभिषेक घालून त्यांना पुष्पहार अर्पण करून अष्टगंध लावतात आणि त्यानंतर स्वामी समर्थांचे प्रतिमेला फुलं आणि अक्षता वाहतात.
मग तिथे स्वामी समर्थांच्या वर बसू स्वामीच्या तारक मंत्राचा जप करत असतात आणि स्वामीची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवतात अशा प्रकारे दररोज सकाळी स्वामी समर्थांची पूजा ही लोक करत असतात.
परंतु ही पूजा करत असताना त्याबरोबर स्वामी समर्थांची आणखी एक विशेष सेवा जर का आपण केली तर यामुळे स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होती आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि सगळ्या समस्यांना दूर करतील.
तर ही सेवा करत असताना आपल्याला गुरूचरित्रातील एका आध्यायचे वाचन करायचे आहे. गुरुचरित्र मधील प्रत्येक अध्याय हा विविध समस्यांसाठी अगदी फायदेशीर आहे, त्यामुळे आपण एकदा तरी संपूर्ण गुरुचरित्र पारायणयाचे वाचन केलेच पाहिजे.
हे गुरुचरित्र पारायण फक्त 7 दिवसांची असते परंतु गुरुचरित्र मधील हा 9 नंबरच्या एक अध्यायाचे जर आपण सकाळच्या वेळी किंवा रात्री झोपताना केले तर त्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर राहते.
परंतु या एका अध्यायांचे वाचन आपल्याला सकाळच्या वेळी आपली देवपूजा झाल्यानंतर तेथे श्री स्वामी समर्थांचे प्रतिमेसमोर बसून करायचे आहे.
याचा चांगला फायदा आपल्याला मिळतो. त्याच बरोबर अध्याय वाचत असताना तुम्हाला त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घेऊनच अध्यायाचे वाचन करायचे आहे.
तसेच सकाळच्या वेळी स्वामी समर्थांचे प्रतिमेसमोर बसून तिथे दिवा अगरबत्ती लावून यांचे वाचन तुम्हाला करायचेच आहे आणि याचे वाचन करण्यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र मधील 9 वा अध्याय रोज सकाळच्या वेळी किंवा ज्या वेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी वाचायचा आहे.
दररोज एकदा हा 9 नंबर मनापासून आणि श्रद्धेने वाचायला सुरुवात केली तर यामुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि त्याच बरोबर श्री स्वामी समर्थ महाराज आमच्यावर प्रसन्न होतील..श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
अशा प्रकारे गुरुचरित्र मधील 9 नंबरचा अध्याय तुम्ही वाचन केला तर तुमच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडून येतील….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments