नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 28 एप्रिल आपल्या सर्वाचे गुरु श्री स्वामी समर्थ याची पुण्यतिथी आहे, भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख संपूर्ण जगभर आहे.
आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मंदीरामध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
तसेच पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्षस माधी मठ स्थानी’ आपल्या अवतारकार्याचीस माप्ती केली.
यंदा 28 एप्रिल या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने समर्थांच्या भक्तांसाठी हा दिवस खास ठरणार आहे.
या दिवशी जर का आपण स्वामींची मनोभावे पूजा केली तर आपल्या आयुष्यात अनेक बदल घडून येऊ शकतात.
आपणांस सांगू इच्छितो कि श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंच महाभुतांवर कायम सत्ता आणि प्रभुत्व होते.
कारण श्री समर्थ यांनी जात, पात, धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. तसेच त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत.
त्यांनी अनेक माध्यमातून सामाजिक भेद दूर केले अनेक लोकांच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद तयार केली.
स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी उठल्यावर हा एक मंत्र बोला आणि चमत्कार बघा तुमच्या जीवनात शुभ घटना घडतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील.
कोणत्याही गोष्टीची कमी ठेवणार नाही. स्वामी समर्थांची पुण्यतिथी काही दिवसांनंतर येत आहे, ही पुण्यतिथि 28 एप्रिल गुरूवारच्या दिवशी आहे.
गुरुवारचा दिवस तुम्हाला माहीतच असेल कि गुरुवारचा दिवस स्वामींचे आवडता दिवस मानला जातो आणि या दिवशी प्रदोष सुद्धा आहे.
पुण्यतिथी त्यासोबत गुरुवार आणि प्रदोष म्हणून या दिवसाची मान्यता खूप जास्त आहे आणि हा दिवस खूपच शुभ आहे.
तर आपण स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे सेवेकरी आहोत तर सकाळपासूनच आपल्या जीवनात आपण स्वामींची सेवा करायची आहे.
त्यामुळे या दिवशी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी अंघोळ करावी. मग अंघोळ झाल्यानंतर काहीच न खाता न पिता स्वामींच्या समोर स्वामींच्या मूर्ती समोर फोटोसमोर देवघरासमोर बसावे.
मग त्यानंतर आपला हात जोडून किंवा माळ असेल तर माळ घेऊन तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे.
कमीत कमी 11 वेळेस आणि जमलं तर 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ त्या मंत्राचा जप सकाळी तुम्हाला करायचा आहे आणि या मंत्र जपाने तुम्हाला दिवसाची सुरुवात करायचे आहे. मग तुम्ही दुसरी कोणतीही सेवा केली तरी चालेल.
पण तुम्हाला दिवसाची सुरुवात या मंत्राने करायची आहे. तर हा चमत्कारिक मंत्र काही असा आहे, की “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”,” श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” हा मंत्र आहे.
तुम्ही यांचे 11, 21, 51 किंवा 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ त्याचा जप केला तरी चालेल.
परंतु दिवसाची सुरुवात स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवस जप करूनच करा. जीवनात नक्की चांगले बदल होतील शुभ घटना घडतील..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments