नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी?, नित्यसेवा सोपी सेवा कशी करावी? तर मित्रांनो स्वामींची सेवा कशी आणि काय करावी? ,तसेच नैवेद्य कसा दाखवावा?
यासाठी आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे ते समजून घ्या आणि तुमची नित्य सेवा सुरू करा आणि अनुभव घ्या.
तर नवीन श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो फ्रेम किंवा मूर्ती तातडीने आपल्या देवघरात आणून अभिषेक करून स्थापन करून घ्यावी. कारण त्याशिवाय सेवा करू शकतात, पण मूर्ती किंवा फोटो असलेल्या कधीही चांगलं असतं.
मग त्यानंतर तो फोटो किंवा मूर्ती देव्हाऱ्यात मध्यभागी गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या आत तुम्ही स्थापन करून घ्यावी व त्या दिवशी गोडधोड जेवणाचा नैवेद्य स्वामींना दाखवावा आणि पंचोपचार पूजा करून सकाळची आरती म्हणावी.
त्यानंतर रोज नित्य पंचोपचार पूजा करून स्वामींना दूध साखरे जास्त काय नेवेद्य दाखवावा. त्यानंतर घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाही आहेत.
फक्त घरात आपण जेवायचा हात स्वामींना नैवेद्य दाखवावा किंवा जेवणाची घाई घरातल्यांना असतील काम धंदा चालण्यासाठी स्वामींचे ताट हे वेगळे काढून ठेवावे व 10.30 ते दाखवाव.
कारण श्री स्वामींच्या नैवेद्य दाखवणाऱ्या वेळ ही 10.30 आहे पण आजकाल लोक 12 वाजेच्या आत नैवेद्य दाखवतात.मग त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा आणि 11 माळी जमत नसतील तर 1 माळ केली तर चालेल.
तसेच माळ नसेल तर 20 मिनिट जप करावा व 3 अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचावे. सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात तुम्ही केव्हाही वाचू शकतात, मात्र खंड पडू देऊ नका.
दिवसातून म्हणजे तुम्ही दुपारी सुद्धा वाचवू शकता. याशिवाय नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्य ताठ ठेवावे व नैवेद्य दाखवण्यात पूर्वी व दाखवल्यानंतर स्वामींना नमस्कार करावा.
मग निवेद्य आठवणीने तुळशीच्या पानाने “ओम प्राणाय स्वाहा”, म्हणत नैवेद्य दाखवावा. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी व सायंकाळी नैवेद्य दाखविल्याशिवाय जेवण करू नये.
रात्री ताजे जेवम तयार केले नसेल तर महाराजां पुरता भात करून दूध भात अथवा दूध साखर यांच्या नैवेद्य दाखवावा. मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे दररोज स्वामींची सेवा करू शकतात.
ही सोपी नित्यसेवा आहे, म्हणजे जो नवीन सेवेकरी असेल किंवा जुना सेवेकरी असेल त्यांना जमत नसेल त्यांना जमत असेल यासाठी सोपी स्वामींची सेवा आहे. त्यामुळे ही नित्य सेवा तुम्ही घरातल्या घरात तुम्ही दररोज न चुकता करू शकतात.
या सेवेमुळे तुम्ही ही सर्व काम पूर्ण इच्छा ठेवून करत जा आणि ही काम या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments